14 वर्षांच्या आमच्या अनुभवातून आम्ही आमच्या क्लायंट ना नेहमीच फायदेशीर असे गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून देत असतो.
शेअर्स मधील गुंतवणूक ही जरी जोखमीची असली तरी,कमीत कमी जोखीम कशी घ्यायची , भांडवल वेगवेगळ्या सेक्टर मध्ये गुंतवून जोखमीच्या तुलनेत चांगला नफा कसा मिळवावा, याबाबत आम्ही कायम आमच्या क्लायंट शी चर्चा करून योग्य सल्ला देण्याचा प्रयत्न करतो.
आमच्या Advisory system
चा उपयोग करून आपण सुद्धा शेअर्स मध्ये कमीत कमी जोखीम घेऊन आकर्षक नफा कमवू शकता.
नमस्कार !!!
आतापर्यंत आपण गोल्ड़बीज, निफ्टीबीज , बँक बीज , आणि ब्लू चिप स्टॉक या चार प्रोडक्ट विषयी तसेच इटीफ या संकल्पने विषयी सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
त्याचा आढावा घेताना हे प्रोडक्ट आपल्याला भांडवल वृद्धी साठी नेमके कसे उपयोगी ठरतात ते एकदा थोडक्यात पाहू.
वार्षिक सरासरी बारा ते वीस टक्के परताव्या चे लक्ष ठेवताना आपण गोल्ड़बीज वा निफ्टीबीज चा पर्याय निवडू शकता. त्यात दरमहा आमच्या स्मार्ट SIP या पध्दती चा अवलंब केल्यास वार्षिक बारा ते वीस टक्के लक्ष सहज गाठता येते.
आमच्या रिसर्च अँड आड्वायजरी सिस्टम च्या मदतीने ब्लू चिप स्टॉक मधील गुंतवणूक अधिकाधीक सुरक्षित वा आकर्षक नफा देणारी ठरते.
दरमहा दिड ते पाच टक्के नफा मिळवण्याचे लक्ष गाठताना आपल्याला गोल्ड़बीज व निफ्टीबीज मधे आमच्या स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रँटेजी च्या माध्यमातून काम करावे लागते. यापैकी निफ्टी चे भाव,जर काही काळ एकाच पातळीवर फिरत राहिले, तर त्या काळासाठी आपले भांडवल अडकून राहू शकते हे लक्षात घ्यावे लागते. मात्र गोल्ड च्या बाबतीत अशा स्थितीत सुद्धा चांगला नफा मिळतो. त्यामूळे दरमहा नफा घेताना सुरक्षिततेच्या दृष्टीने गोल्ड व निफ्टी यात विभागुन गुंतवणुक करावी.
जागतिक भांडवली बाजारात कायमच सोने हे शेवटचा सुरक्षित पर्याय म्हणून बघितले जाते. त्यामुळे जागतिक इक्विटि बाजार जेव्हा जेव्हा कोलमडतात तेव्हा तेव्हा सोन्यातील गुंतवणुक जोर धरते. आणि जागतिक इक्विटी बाजार नवा उच्चांक गाठतात तेव्हा सोन्यातील गुंतवणूक ही ओघाने कमी होते. त्यामुळे चाणाक्ष गुंतवणूकदार कायम सोने आणि निफ्टी यात एकाच वेळेस विभागुन गुंतवणूक करणे योग्य समजतात.
थोडक्यात, गोल्ड़बीज आणि निफ्टीबीज च्या माध्यमातून आपण दरमहा तसेच वार्षिक स्तरावर आकर्षक परतावा मिळवू शकतो. तसेच ब्लू चिप स्टॉक मधे स्मार्ट पद्धतीने गुंतवणूक करुन आपण आपल्या भांडवल वृद्धीचे नवे शिखर गाठु शकतो.
सोने आणि निफ्टी मधील SIP तसेच स्टॉक मधील गुंतवणुकी साठी आम्हाला जरुर संपर्क करा.
यश नगरकर 9325299728
गणेश हजारे 9371488633.
पुढील लेखात आपण ट्रेडिंग च्या योग्य पर्यायांचा मागोवा घेणार आहोत. आकर्षक फायदा मिळवत असताना नुकसानीचे नियोजन कसे करावे हे बघणार आहोत.
ट्रेडिंग
हा विषय जरी व्यापक असला तरी त्याबाबत थोडक्यात पण मुद्देसूद माहिती घेण्याचा प्रयत्न आपण करू
शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग चे दोन प्रकार आहेत. एक लॉंग ट्रेड आणि दुसरा शॉर्ट सेल ट्रेड.
लॉंग ट्रेड म्हणजे कमी भावात शेअर खरेदी करून त्याचा भाव वाढला की तो विकणे. शॉर्ट सेल ट्रेड म्हणजे अगोदर शेअर विकणे आणि विकलेल्या भावाच्या तुलनेत त्याचा भाव कमी झाला की तो खरेदी करणे.
इन्ट्रा डे ट्रेडिंग म्हणजे आजचा सौदा आजच क्लोज करणे. आणि पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे सौदा केल्याच्या दुसऱ्या दिवसापासून केव्हाही सौदा पूर्ण करणे.
वरील माहिती ट्रेडिंग प्रक्रियेचे प्राथमिक ज्ञान आहे.
ट्रेडिंग साठी शेअर मार्केट मध्ये पुढील प्रोडक्ट उपलब्ध आहेत.
- इक्विटी 2. फ्युचर 3. ऑप्शन 4. ई टी एफ
ही सगळी प्रोडक्ट सर्वात अगोदर अभ्यासणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे इक्वीटी – कमोडिटी – करन्सी अशा तीन वेगवेगळ्या सेगमेंट ट्रेडिंग साठी उपलब्ध आहेत. त्याचाही अभ्यास असणे आवश्यक आहे.
ट्रेडिंग ही अशी प्रक्रिया आहे जी यशस्वी होण्यासाठी नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण काम करावे लागते.
ट्रेडिंग मध्ये शेवटी नुकसानच होते असा चुकीचा समज आपल्याला सर्वत्र बघायला मिळतो. त्याचे कारण नियोजन आणि सातत्य याचा अभाव.
शेअर मार्केट मधील ट्रेडिंग ही प्रक्रिया नफा व नुकसान या दोन परिणामांची साखळी असते.
यशस्वी ट्रेडर कायम नुकसान manage
करून नफ्याचे सातत्य टिकावू शकतो.
नुकसान manage
करून नफ्याचे सातत्य टिकवणे ▶️
यासाठी पुढीलप्रमाणे किमान सहा वेगवेगळ्या स्तरावर नियोजन करावे लागते
- मनी management
- Risk management
- ट्रेड सेटअप management
- Emotion management
- Time management
- Selection of product
वरील प्रत्येक स्तरावर एक स्वतंत्र पुस्तक लिहिले जाऊ शकते.
इथे मात्र आपण यातील प्रत्येक स्तर थोडक्यात पण मुद्देसूदपणे अभ्यासणार आहोत आणि वर उल्लेख केलेल्या ट्रेडिंग साठी उपलब्ध चार प्रोडक्ट विषयी सुद्धा थोडक्यात माहिती घेणार आहोत ती पुढील लेखात…..
नमस्कार !!
आपण ट्रेडिंग या विषयावर महत्त्वाचे मुद्दे अभ्यासत आहोत.
हा विषय सुरू करण्या पूर्वी, भांडवल वृद्धी साठी गुंतवणुकीचे नियोजन नेमके कसे असावे, याबाबत काही निकष आम्ही, भांडवली बाजारातील आमच्या अनुभवानुसार सुचवतो.
भांडवलाच्या पन्नास टक्के रक्कम ही सोने व निफ्टी यातील दरमहा केल्या जाणाऱ्या SIP
साठी राखीव असावी.
उर्वरित पन्नास टक्के रक्कम ही ब्लू चीप स्टॉक मध्ये गुंतवणे निश्चितच योग्य ठरते.
आमच्या monthly income
प्रोडक्ट पैकी गोल्ड बीज, निफ्टी बीज आणि बँक बीज या पैकी कोणत्याही एक अथवा तीनही प्रोडक्ट मध्ये विभागून अशी गुंतवणूक केली तरी ती फायदेशीर ठरते.
Monthly income Product
ची निवड केल्यास गुंतवणुकीचे नियोजन पुढीलप्रमाणे असावे.
पन्नास टक्के रक्कम ही SIP
साठी निर्धारित असावी. पंचवीस टक्के रक्कम ही ब्लू चीप स्टॉक मध्ये गुंतवावी , आणि उर्वरीत पंचवीस टक्के रक्कम ही monthly product
साठी असावी.
आमच्या अनुभवानुसार भांडवलाची शक्य तितकी योग्य विभागणी आम्ही सुचवितो. अंतिम निर्णय हा गुंतवणूकदार स्वतः घेत असतो.
आता आपण ट्रेडिंग या मूळ विषयाकडे वळूयात.
- प्रोडक्ट आणि सेगमेंट
- प्रत्येक प्रोडक्ट आणि
त्याबाबत आपला दृष्टिकोन - प्रोडक्ट ची निवड
- ट्रेडिंग मधील यश टिकावे
यासाठी सहा स्तरात केलेले
नियोजन. - लिव्हरेज अथवा एकस्पोजर –
सुविधा की नुकसानीचा
सापळा?
वरील पाच मुद्दे आपण सविस्तरपणे पुढील लेखापासून बघणार आहोत.
नमस्कार !!
मागच्या लेखानुसार, आपण ट्रेडिंग या विषया अंतर्गत पहिला मुद्दा बघणार आहोत तो म्हणजे
प्रोडक्ट आणि सेगमेंट
ट्रेडिंग साठी इक्वीटी , फ्युचर , ऑप्शन , ई टी एफ असे चार प्रोडक्ट उपलब्ध आहेत आणि इक्विटी, कमोडिटी , करन्सी अशा तीन सेगमेंट उपलब्ध आहेत.
इक्विटी सेगमेंट मध्ये
- इक्विटी म्हणजे शेअर्स खरेदी
करणे आणि नफा मिळत
असेल तर विकणे. - आपल्याकडे असलेले शेअर्स
अगोदर विकणे आणि
खालच्या भावात खरेदी
करणे.
पहिला ट्रेडिंग चा प्रकार
इंट्रा डे आणि डिलिवरी असा
दोन्ही पद्धतीने करता येतो.
डिलिवरी म्हणजे आज घेतलेला शेअर आज न विकता दुसऱ्या दिवसापासून केव्हाही विकणे.
दुसरा प्रकार म्हणजेच शॉर्ट सेलिंग, हा मात्र फक्त इंट्रा डे करता येतो. यात डिलिवरी ट्रेडिंग करता येत नाही.
इक्वीटी सेगमेंट चे दुसरे प्रोडक्ट म्हणजे फ्युचर
यात मात्र इंट्रा डे आणि डिलिवरी असे दोन्ही प्रकारे काम करता येते.
फ्युचर म्हणजे शेअर्सच्या विशिष्ट संख्येचा एकत्र गठ्ठा. त्याला इंग्रजीत लॉट साईज असे म्हणतात. उदाहरणार्थ निफ्टी शेअर्सच्या फ्युचर ची लॉट साइज 75 आहे. रिलायन्स शेअर चा फ्युचर लॉट साइज 505 आहे. या प्रकारात एक सिंगल शेअर मध्ये ट्रेडिंग करता येत नाही.
इक्वीटी सेगमेंट चे तिसरे प्रोडक्ट म्हणजे ऑप्शन.
या प्रोडक्ट मध्ये फ्युचर प्रमाणेच लॉट साइज ठरवलेली असते. यामध्ये इंट्रा डे आणि डिलिवरी असे दोन्ही प्रकारे काम करता येते.
कमोडिटी आणि करन्सी सेगमेंट या दोन्ही मध्ये फ्युचर आणि ऑप्शन असे दोन प्रोडक्ट उपलब्ध आहेत.
पुढील लेखात आपण
प्रत्येक प्रोडक्ट बाबत आपला दृष्टिकोन आणि आपल्या आर्थिक , मानसिक कुवती नुसार तसेच आपल्या आर्थिक उद्दिष्टां नुसार आपल्याला करावी लागणारी प्रोडक्ट ची निवड
या विषयी माहिती घेणार आहोत.
नमस्कार !!
प्रोडक्ट बाबत आपला दृष्टिकोन
भांडवली बाजारात तेजी म्हणजे वरच्या दिशेने , मंदी म्हणजे खालच्या दिशेने असे दोन दृष्टिकोन ठेवून काम केले जाते.
हा दृष्टिकोन पुन्हा दोन प्रकारे विभागला आहे. एक मूलभूत दृष्टिकोन आणि दुसरा चालू स्थितीप्रमाणे असलेला दृष्टिकोन.
आपण उदाहरण पाहू. सर्वसामान्य पणे,कोणत्याही शेअर चा भाव खाली यावा आणि तो कायम खालीच रहावा असे, कोणत्याही गुंतवणूकदाराला वाटू शकत नाही. कारण गुंतवणुकी चे मूल्य वाढुन नफा मिळवायचा असेल तर शेअरचा भाव खाली राहून कसे चालेल ?
याचाच अर्थ थोडक्यात शेअर या प्रोडक्ट विषयीचा दृष्टिकोन, त्यातही वर म्हटल्याप्रमाणे मूलभूत दृष्टिकोन हा तेजीचा असायला हवा. तात्पुरता किंवा चालू स्थितीप्रमाणे असलेला दृष्टिकोन हा कदाचित मंदीचा असू शकतो.
ट्रेडिंग करत असताना ज्या प्रोडक्ट चा वापर आपण करत असतो, त्या विषयीचा मूलभूत दृष्टिकोन जर चुकीचा असेल तर ट्रेडिंग चा पायाच कच्चा राहतो.
म्हणून ट्रेडिंग सुरू करण्यापूर्वी आपण जे प्रोडक्ट वापरणार आहोत त्याबाबत मूलभूत दृष्टिकोन कोणता असायला हवा हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आता आपण ट्रेडिंग साठी उपलब्ध असलेल्या , मागील लेखात उल्लेख केलेल्या चार प्रोडक्ट बाबत दृष्टिकोन कसा असावा हे पाहू.
शेअर , फ्युचर, ऑप्शन आणि
इ टी एफ.
वर म्हटल्या प्रमाणे शेअर विषयी मूलभूत दृष्टिकोन हा तेजीचा असणे योग्य आहे , तसेच फ्युचर आणि इ टी एफ चा मूळ स्त्रोत हा शेअर च असल्याने त्या दोन्ही प्रोडक्ट कडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा तेजीचा च असायला हवा.
आता आपण ऑप्शन कडे पाहू.
ऑप्शन हे प्रोडक्ट शेअर आणि निर्देशांक यावर आधारित असले, तरी ते महिना आणि काही बाबतीत आठवडा अशा मर्यादित कालावधी साठी उपलब्ध असते. म्हणजे त्याचा निर्धारित कालावधी पूर्ण झाला की, हे प्रोडक्ट ट्रेडिंग साठी उपलब्ध नसते.
थोडक्यात हे प्रोडक्ट शेअर , फ्युचर आणि इ टी एफ प्रमाणे नसून मर्यादित कालावधी साठी उपलब्ध असल्याने त्याविषयीचा मूलभूत दृष्टिकोन हा कायम मंदीचा असायला हवा.
दृष्टिकोन विषयक हा उहापोह आपल्याला प्रत्यक्ष ट्रेडिंग करताना खूप फायद्याचा ठरतो.
आता आपण
‘ प्रोडक्ट ची निवड ‘ याकडे पाहू.
ट्रेडिंग साठी प्रोडक्ट ची निवड करताना, आपली आर्थिक क्षमता तसेच मानसिकता, या दोन्हींचा विचार अतीशय महत्त्वपूर्ण ठरतो.
तसेच आपले आर्थिक उद्दिष्ट नेमके कसे आहे त्यावर सुद्धा प्रोडक्ट ची निवड बहुंतांशी अवलंबून असते.
अशा निकषांवर आधारीत योग्य प्रोडक्ट ,जे आपले आर्थिक उद्दिष्ट गाठण्यासाठी उपयोगी ठरेल, कसे निवडावे हे पुढील लेखात पाहू.
नमस्कार !!
शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून , आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यात , आपल्या मानसिकतेचा फार मोठा वाटा असतो.
मोठे आर्थिक उद्दिष्ट ठेवताना, गुंतवणूकी विषयी आपली मानसिकता ही व्यावसायिक असायला हवी.
अभ्यास , शिस्त आणि संयम यांच्या मदतीने अशी मानसिकता तयार होऊ शकते.
आर्थिक नियोजन करताना कायम आपल्या उत्पन्नातून ठरावीक टक्के रक्कम ही गुंतवणुकीसाठी आरक्षित असावी. इतर कोणत्याही कारणास्तव ती रक्कम शक्यतो वापरू नये. इतर व्यवसाया प्रमाणेच गुंतवणुकी बाबत धरसोड करण्याची मानसिकता नुकसानकारक ठरते.
ट्रेडिंग करताना ज्या विविध मानसिकता लोकांमध्ये आढळतात त्याविषयी थोडे पाहू.
काही लोक अचानक मनात आले की ट्रेडिंग सुरू करतात आणि त्या रकेमेची दुसरीकडे गरज लागली की ट्रेडिंग मध्येच बंद करतात. पुन्हा केव्हातरी चालू करतात आणि बंद करतात. त्यात सातत्य नसते.
काही लोक ट्रेडिंग हा फावल्या वेळात करण्याचा प्रकार समजतात , तर काहीजण त्यातून मनोरंजन मिळवण्याचा प्रयत्न करतात. काहींना तर ट्रेडिंग ही जादूची छडी असून त्यातून झटपट श्रीमंत होण्याची स्वप्न देखील पडतात. त्याचबरोबर अनेकांची ट्रेडिंग म्हणजे सट्टा करून घामाचा पैसा स्वतःहून बुडवणे अशी ठाम समजूत असते.
वास्तविकता अशी आहे की गुंतवणूक , ट्रेडिंग , आणि सट्टा असे तीनही प्रकार शेअर मार्केट मध्ये उपलब्ध असून आपल्याला नेमके काय हवे आहे आणि आपण त्यासाठी नेमके काय करावे हे बहुतांश लोकांना निदान भारतात तरी समजलेले नसते. याचे कारण आर्थिक साक्षरता ही भारतात इतर देशांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.
अनेक लोक गुंतवणुकीच्या नावाखाली नकळत सट्टा करीत असतात , तर बरेच जण ट्रेडिंग करतो आहोत असे समजून नकळत सट्टा करीत असतात.
गुंतवणूक , ट्रेडिंग आणि सट्टा हे तीनही प्रकार योग्य रीतीने जनमानसात समजण्याची खूप गरज आहे , तरच सर्वसामान्य लोकांचा शेअर मार्केट कडे बघण्याचा दृष्टीकोन निर्दोष होईल.
गुंतवणूक जितकी विभागलेली तितकी त्यात नुकसान होण्याची शक्यता कमी , ट्रेडिंग जितके शिस्तबध्द आणि अभ्यासपूर्ण तितकी त्यात नियमीत उत्पन्नाची शक्यता अधिक , मात्र सट्टा हा जाणीवपूर्वक केला वा अजाणतेपणी त्यात भांडवल सुरक्षित राहण्याची हमी फारच कमी.
थोडक्यात भांडवल वृद्धी साठी, प्रोडक्ट ची निवड करताना
1.दरमहा निफ्टी व सोन्याची SIP
- स्टॉकस् मधील गुंतवणूक
- दरमहा उत्पन्नासाठी
सोन्यातील गुंतवणूक - निफ्टी व बँक निफ्टी
ई टी एफ चे ट्रेडिंग
या चारही प्रकारात आपले भांडवल विभागून गुंतवावे असे आमचा अनुभव सांगतो.
पुढील लेखा पासून आपण ट्रेडिंग मध्ये दीर्घकाळ टिकण्यासाठी सहा स्तरात कसे नियोजन करावे हे बघू.
Unnati Investments (c)
9371488633/ 9325299728