Monthly Income from Gold या प्रोडक्ट मध्ये आपण Goldbees चा उपयोग करतो.

Goldbees हे exchange traded fund म्हणजेच ETF 
आहे, ज्या माध्यमातून आपण सोन्या मध्ये investment
करतो.

यात आपण , दर दिवशी , आपल्या संपूर्ण investment 
मधील, काही टक्के रकमेच गोल्ड, ठराविक rate
मध्ये खरेदी करतो.

या प्रक्रियेचा परिणाम म्हणून,  महिन्याच्या शेवटी जेव्हा, आपली संपूर्ण रक्कम सोन्या मध्ये गुंतवली जाते, तेव्हा आपल्या खरेदीचा दर , हा सोन्याच्या चालू दरापेक्षा दोन ते तीन टक्के कमी होतो.

आपल्या खरेदीचा दर आणि मार्केट मधील चालू दर , यातला दोन ते तीन टक्के मिळणारा हा फरक , हाच आपला नफा.

यातून ब्रोकर चे कमीशन आणि सरकारी टॅक्सेस वगळता दिड ते दोन टक्के निव्वळ नफा आपण दरमहा मिळवू शकतो.

यामध्ये सोन्याचा भाव एखाद्या महिन्यात स्थीर राहिला तरीही आपल्याला नफा मिळू शकतो .

एखाद्या महिन्यात सोन्याचा भाव वाढला तर आपल्या गुंतवणुकीच्या विशिष्ट पद्धती मुळे आपल्या नफ्यात वाढच होते.

एखाद्या महिन्यात सोन्याचे भाव सलगपणे खाली आले तर आपल्याला सोन्यामध्ये तेजी येईपर्यंत काही काळ वाट पहावी लागते.

परंतु सोने हे जगाचे विनिमय करण्याचे सगळ्यात सुरक्षित माध्यम असल्याने त्याचा भाव फार काळ खालच्या स्तरावर टिकत नाही.

वर्षातील बारा महिन्यापैकी सरासरी आठ ते दहा महिने आपण या प्रोडक्ट चा वापर करून दरमहा आपल्या गुंतवणुकी वर सुरक्षित नफा मिळवू शकतो.

या प्रक्रियेचे प्रत्यक्ष उदाहरण नॅशनल स्टॉक एक्सचेंज च्या वेबसाईट चा उपयोग करून आपण पाहू शकतो.